आजच्या काळात इंटरनेट मुळे आपले आभासी जग अमर्यादित विस्तारले गेले असले तरी प्रत्यक्षातील जग मात्र आक्रसत चालले आहे. सोशल मिडियावर हजारो फ्रेंडस् आणि फोल्लोअस॔ मिरवताना गरजेच्या वेळी मात्र प्रत्यक्ष मदतीचा हात मिळेलच, असा परीवार आपण निर्माण केला आहे का, याचा विचार करायला हवा.
परिवार….कुटुंब.  कूटुंब म्हणजे एकमेकांशी  नातीगोती असलेल्या माणसांचा समूह. ही नाती जन्म,लग्न यामुळे तयार होतातच पण घनिष्ठ संबंध असलेल्या शेजार्यांमूळेही तयार होतात.
पुर्वीच्या काळची वाडा व चाळ संस्कृती बंद होऊन फ्लॅट सिस्टीम सुरु झाली.तासनतास उघडी राहणारी घराची दारं बंद राहू लागली. दूध-साखरेची देवाणघेवाण बंद झाली. हक्काने बाजुच्या घरात चहाला , जेवायला जाणे बंद झाले. नवीन, वेगळ्या पद्धतीने केलेली भाजी चवीला म्हणून देणे कमी होऊ लागले. आणि हे सर्व होत असताना घराचा भक्कम पाया असलेली एकत्र कूटुंब पद्धतीही नाहीशी होत चालली.
सर्वेक्षणानुसार असे आढळून आले आहे की, तुमच्या घराचं ठिकाण जर सुरक्षित असेल, तुमचे शेजारी विश्वासातील आणि तुमच्याच कुटुंबाचा भाग झाल्यासारखे असतील तर नैराश्य, ताणतणाव, आजार हे सर्व टाळून सुंदर आणि आरोग्याने भरपुर असे आयुष्य जगण्याची शक्यता कैक पटींनी वाढते.
आणि म्हणूनच प्रोम गृप तुमच्यासाठी कोकणातील दापोली जवळच्या गावतळे गावात  एक एक गृहप्रकल्प साकारत आहेत. ज्याचं नाव आहे…”कुटुंब”. जिथे तुम्ही स्वप्नपूर्तीसाठी प्रवेश कराल आणि वास्तव्य कराल समाधानासाठी. एक वेगळा अनुभव…निसर्गात राहण्याचा, मोकळ्या वातावरणाचा, जीवलगांबरोबर जगण्याचा. जिथे तुमचं स्वतःच्या बंगल्यात राहण्याचं स्वप्न पुर्ण होइल आणि त्याच्या आठवणी तुमच्या मनाच्या कोपर्यात सतत ताज्या राहतील.
जिथे साथ असेल तूम्हाला निसर्गाची, वृक्षांची, झाडाझुडपांची, उद्यानांची. कोव्हिडच्या काळात अनमोल असलेला ऑक्सीजन  इथे पावलोपावली मिळेल. त्यामूळे आरोग्यही उत्तम राहिल. वर्क फ्रॉम होम साठीची कार्यक्षमता इथे नक्कीच वाढेल.
प्रोम गृप   ” कुटुंब ”  या प्रकल्पासाठी प्रत्येक बंगल्यात भरपुर सोयीसुविधा देत आहे. ज्यात असेल घरासाठी लागणारे आवश्यक फर्निचर. जसं की सोफा सेट, बेड, वॉर्डरोब,मॉड्युलर किचन विथ डिनर सेट, इंडक्शन प्लेट. तसंच टीव्ही , फ्रिज, वॉशिंग मशीन, पडदे, ब्रँडेड टाईल्स ,पाईप्स. अगदी पायपुसणी, डस्टबीन, झाडूपासून सर्वच.  त्याचबरोबर पुढील 5 वर्षांचा मेंटेनन्स ही असणार आहे.अगदी मोफत.
नवीन सुविधांबरोबर जुन्याची सांगड घालताना इथल्या घरांना कोनाडेही आहेत बरं का!  गावातील सहजता, निरागसता इथे मिळत असेल तर मग वाट कसली बघता. येताय न कोकणात. निसर्गाच्या सान्निध्यात…
स्वागत आहे.🙏🏻